News 
    पोहे खाल्ल्यानंतर चहा पिणे टाळा ( Dr. Harish Patankar )

    Posted On May 20,2021

      

    कारण संकृत मध्ये पृथुका लाह्या जाड केल्या की त्याचे पोहे बनतात. या पोह्यांवरती ज्यावेळी फोडणी, मसाले टाकले जातात. त्याच्या स्वाभावत काही गुणधर्मामुळे ते पित्तकारक बनतात. बऱ्याचदा पोहे खाल्यानंतर त्यावर पिलेला चहा हा जास्त पित्तकारक ठरतो. त्याचबरोबर पोहे अत्यंत वातुड आणि मलावष्टंभ निर्माण करणारे आहेत. त्यामुळे ज्या ज्या रुग्णांमध्ये पोट साफ होत नाही किंवा पोट साफ व्हायला त्रास होतो, पित्त वाढते अशा व्यक्तींनी पोहे खाणे टाळावे. कारण पोहे खाल्याने प्रवाहिका म्हणजे पोट साफ होणे न होने हा आजार पाठीमागे लागतो. त्यात पोह्यांनंतर चहा पिणे टाळले पाहिजे.