News 
    माझी वसुधरा अभियान ( Dr. Harish Patankar )

    Posted On November 05,2020

      
    #पंचमहाभूते आयुर्वेदाचे सर्वच सिद्धांत शाश्वत आहेत. मी "स्मृति आयुर्वेद" या कार्यक्रमांतर्गरत 2008 पासून शालेय शिक्षण पद्धतीत आयुर्वेदाचे सिद्धांत शिकविण्यासाठी आग्रही भूमिका मांडत आहे. आता हाच पंच महाभूतांचा सिद्धांत बघा. समिती मध्ये गटचर्चा घेताना , मुलांना शाळेत शिकविताना मी हा सिद्धांत अगदी 1857 चा उठाव, झाशी च्या राणीचा संघर्ष, इव्हेंट मॅनेजमेंट किंवा अगदी चोर पकडताना याचा कसा फायदा होतो हे समजावून सांगताना वापरायचो. अगदी तत्कालीन पुण्याचे पोलिस आयुक्त श्री सत्यपाल सिंग यांना मी या पंच महाभूत व सप्त पदार्थ या सिद्धांताच्या आधारे चोर पकडायला कशी मदत होते ते सांगितलं होतं. त्यांनीही आश्चर्य व्यक्त करुन लगेच या विचारांचे कौतुक ही केले व पुढे माझ्या या #स्मृति_आयुर्वेद च्या पुस्तक व DVD प्रकाशनास ही आवर्जून आले. अनेक शाळांमध्ये पुणे महानगरपालिकेच्या संमतीने आम्ही हा उपक्रमही चालवला, आज अचानक सकाळ मध्ये यावर आधारित गावांच्या विकासाची पंच महाभूतांचा सिद्धांत नुसार आखलेल्या कामांची बातमी वाचली व जुन्या कामाची उजळणी झाली. आयुर्वेद इयत्ता पहिली पासून शिकवला पाहिजे. अनेक क्षेत्रात मूलभूत बदल होतील. धार्मिक मतभेत पण दूर होतील. लोकं शरीर धर्म पालन शिकतील. आयुर्वेद शाश्वत आहे. आयुष्य सुंदर आहे, सुंदर जगा. #आयुर्वेद_अंगिकारा. #वैद्य_पाटणकर_हरिश