News 
    रविवारी `केशायुर्वेद`तर्फे `इनोव्हेटिव्ह आयुर्वेदा`वर आंतरराष्ट्रीय परिसंवाद ( Dr. Harish Patankar )

    Posted On January 24,2019

      

    पुणे : वैद्य हरिश पाटणकर यांच्या संकल्पनेतून आणि बीव्हीजी इंडियाच्या सहकार्याने साकारलेल्या`‘केशार्युवेद` या  भारतातील पहिल्या आयुर्वेदिय हेअर टेस्टिंग लॅब आणि संशोधन केंद्रातर्फे `इनोव्हेटिव्ह आयुर्वेद` यावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

    रविवार, दि. 27 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9.30 वाजता सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमधील सुमंत मूळगावकर सभागृहात हा परिसंवाद होणार आहे. यावेळी नेत्रचिकित्सक डॉ. स्नेहल पाटणकर यांचे `आयुर्वेदिय केश परिक्षण पद्धती व महत्त्व` या विषयावर बीजभाषण होणार आहे. तर वैद्य हरिश पाटणकर `केश व त्वचा विकारांवरील आयुर्वेदिय चिकित्सा` या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

    Read More at : https://www.snewslive.com/international-seminar-on-ayurveda-in-pune/