Achievements 
पारितोषिक वि. समारंभ

Pune  March 30,2017

  

पारितोषिक वितरण समारंभ

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे पंडित जवाहरलाल नेहरु प्राथमिक विद्या मंदिर वारजे पुणे ४११०५८* आयोजित व पालक संघ कार्यकारणी यांच्या सहकार्याने *वार्षिक कला-क्रीडा व शैक्षणिक बक्षिस वितरण समारंभ* *आज शनिवार दि ३०/०३/२०१९ रोजी* *सकाळी ८ वा*. प्रशालेच्या सभागृहात संपन्न झाला.बक्षिस पात्र गुणवंत विद्यार्थ्यांना *वैद्य.हरीश पाटणकर* *(आयुर्वेदाचार्य,नाडीतज्ञ,समुपदेशक* )यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. *तब्बल ४५० विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांची पारितोषिके वाटप करण्यात आली*.वैद्य. हरीश पाटणकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना चुकांतून शिकण्याची शिकवण टोपीवाला व माकड या गोष्टीतून सहजपणे दिली.हाताचे काम हाताला द्या,डोळ्याचे काम डोळ्याला द्या.जिभेचे काम जिभेला द्या,कानाचे काम कानाला द्या.असाही कानमंत्र प्रात्यक्षिकातून दिला.श्री.यशवंत कुलकर्णी यांनी गुणवंत विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.श्रीमती. शारदा हगवणे यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.