Achievements 
प्राचीन गुरुकुल

Pune  March 30,2017

  

नेहमीप्रमाणे प्राचीन संहिता गुरुकुल पुष्प 9 सुद्धा फार उत्तम पार पडले. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवं वळण देणारे ठरले. पाच मिनिटे सुद्धा मोबाईल, व्हाट्स आप, फेसबुक पासून दूर न राहणारी मुलं सलग पाच दिवस विना फोन राहिली, जाताना त्यांना त्यांचा मोबाईल घेऊन जावा म्हणावं लागलं तरी काहीजण तो घ्यायला तयार नव्हते. विलक्षण सामर्थ्य असते गुरुकुल मध्ये ते अनुभवल्याशिवाय समजत नाही. श्वेत वस्त्र परिधान करून सत्व गुणोत्कर्ष चा ध्यास घेतलेली ही मुलं म्हणजे आयुर्वेदाचे भवितव्यच. यांना आदरणीय सुविनय दामले सर, वैद्य संतोष सूर्यवंशी सर, वैद्य हृषीकेश म्हेत्रे सर, वैद्य यशवंत भगत सर, वैद्य श्रीप्रसाद बावडेकर सर असे दिग्गज लाभले होते. उन्हाळा असूनही फार प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या गुरुकुलने सर्वांना खऱ्या अर्थाने ज्ञान पाजून 'कूल' केले. त्यांच्यातील औत्सुक्य, मोह, अरती या गुणांवर तात्पुरता का होईना पण विजय मिळवला. मला वाटत हेच खरं सार्थक आहे या गुरुकुलाच. या सर्व मुलांकडून आयुर्वेद सेवा घडो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना. सर्व लाभलेले गुरुवर्य, विद्यार्थी वर्ग व गुरुकुल चे ज्ञान संकुल विद्यार्थी संघाचे सेवक या सर्वांचेच मनापासून आभार,।। याही वेळी गुरुकुल ला भेट देऊन आम्हाला सर्वतोपरी मदत केल्याबद्दल कृषी विज्ञान केंद्राचे श्री राजुदादा पवार साहेब यांचेही मनापासून आभार. 24 ते 28 मार्च हे पाच दिवस कसे गेले खरच कळलं नाही. गुरुकुल वरून परतताना एक विलक्षण समाधान असते #"आम्हाला काहीतरी दिलेल्याचे आणि विद्यार्थ्यांना बरंच काही मिळाल्याचे" जय आयुर्वेद..!!