Achievements 
  श्री श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल सन्मान देण्यात आला

  Pune  June 28,2021

  श्री श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल सन्मान देण्यात आला :  

  कोणताही पुरस्कार हा आपली जबाबदारी अजून वाढवतो.
  लोकांच्या अपेक्षा वाढवतो आणि आपल्यातील सकारात्मकता ही वाढवतो.
  आणि आनंद अजून द्विगुणित होतो जेंव्हा पुरस्कार देणाऱ्याचा हेतू हा प्रामाणिक व उचित असतो.
  आज मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल व आयुर्वेदातून लोकांमध्ये केलेल्या जनजागृती आणि सकारात्मकतेच्या प्रचार-प्रसारबद्दल श्री गणेश व्यासपीठ व उचित माध्यम समूहातर्फे लॉक डाऊन या कादंबरी वर आधारीत लॉक डाऊन मध्येही माणुसकी जपलेल्या अनेक संस्था व स्वयंसेवकांचा प्रतिकात्मक सन्मान करण्यात आला. 
  मी वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल सर्वच वैद्यकीय क्षेत्रात काम केलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने याचा नम्रपणे स्विकार करतो व हा पुरस्कार आई वडिल आणि गुरु सद्गुरू चरणी अर्पण करतो.
  आपल्या सर्वांचे प्रेम व विश्वास हीच माझी शिदोरी.
  म्हणूनच चिकित्सलयाच ब्रीद वाक्य जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो..
  विश्वास.... परंपरा... व ... शास्त्रशुद्धता....!!
  आपला
  वैद्य पाटणकर हरिश.