Seminar & Programs
  कोरोनाच्या संकटात बीव्हीजीकडून आशेचा किरण; उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी शतप्लसचे उत्पादन

  Pune  April 16,2021

  कोरोनाच्या संकटात बीव्हीजीकडून आशेचा किरण; उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी शतप्लसचे उत्पादन:  

  #शतप्लस
  सध्याच्या काळातील अनेक साथीच्या आजारांपासून आपल्याला वाचविण्यासाठी, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मिळालेले जणू वरदानच.

  आज BVG लाईफ सायन्सेस मार्फत एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात आदरणीय हणमंतराव गायकवाड सर व  रिसर्च हेड डॉ पवनकुमार सर यांनी एकूणच शतप्लस च्या संसर्गजन्य रोगांच्या सरकारी नायडू रुग्णालयात घेतलेल्या रिसर्च चा डेटा व निष्कर्ष सादर केला.
  यावेळी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही ट्रायल झाली ते नायडू हॉस्पिटल चे डॉ सुधीर पातसुपे पण  उपस्थित होते.
  या शतप्लस च्या अगदी कोरोना येण्यापूर्वी पासूनच्या नाव देण्यापासूनच्या कार्यात माझाही खारीचा वाटा असल्याने व मी स्वतः 2000 पेक्षा जास्त  लोकांना व कोविड रुग्णांवर हे वापरल्याने मलाही यावेळी माझे विचार, मत व्यक्त करण्याची संधी मिळाली. 
  खरंतर आदरणीय हणमंतराव गायकवाड सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदात रिसर्च आयुर्वेदाच्या सिद्धांतांना व आधुनिक निकषांना धरून कसे व्हावेत याबद्दल खूप सुंदर माहिती दिली.
  शिवाय BVG 108 च्या अँम्ब्युलन्स वरील 1000 कर्मचारी या शतप्लस च्या सेवनाने कसे बरे झाले व अनेक जणांचे अनुभव याठिकाणी कथन केले. 
  डॉ पवनकुमार यांनी हर्बल  नॅनो टेकनॉलॉजी व शतप्लस निर्मिती आणि संशोधन याबद्दल मार्गदर्शन केले.
  डॉ सुधीर पातसुते यांनी नायडू हॉस्पिटलमध्ये या ट्रायल CTRI अंडर रजिस्टर होऊन कश्या पूर्ण झाल्या व काय सकारात्मक परिणाम दिसून आले हे सांगितले,
  तर मी या औषधातील घटक व त्यांचा आयुर्वेदाच्या  दृष्टिकोनातून शरीर व जंतू , शेती व बीज, होस्ट अँड घोस्ट थेअरी नुसार आपल्या शरीरावर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कसा फायदा होतो त्याबद्दल मार्गदर्शन केले. ज्याप्रमाणे जमीन पिकावू असेल तर त्यावर कोणतेही बी पटकन रुजते व उगवते, त्याचप्रमाणे तुमच्या शरीरात जर जंतुसंसर्ग साठी पोषक वातावरण असेल तर कोविड 19 च काय पण कोणतेही व्हायरल इन्फेक्शन तुम्हाला पटकन होते व वाढते.
  हे औषध शरीराची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवून आजाराला, जंतूंना पोषक वातावरण निर्मितीच होऊ देत नाही.
  त्यामुळे आजार वाढू न देण्याबरोबरच तो बरा करायला पटकन मदत होते.
  थकवा जातो, शक्ती मिळते, इंम्युनिटी कमी झाली असेल तर वाढते, वाढली असेल तर कमी होते, म्हणून हे बेस्ट इंम्युनो मॉड्युलेटर  ड्रग आहे. याचीच सध्या जास्त आवश्यकता आहे.
  काही अन्य औषधे सोबत देऊन आजपर्यंत अनेक कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार याच्या माध्यमातून आजवर आपण यशस्वी केले आहेत. 
  खरंतर आता जनजागृती झाली पाहिजे.
  या महासंसर्गातून वाचायचं असेल तर , आपले आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर आपणही शतप्लस चे नियमीत सेवन केले पाहिजे.
  लहान मुलांपासून ते गर्भिणी पर्यंत हे कोणालाही प्रमाण कमी करून देता येते व हे अत्यंत सुरक्षित व दुष्परिणाम रहित आहे. 
  याचा अवश्य आपण सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. अनेक जणांच्या सोयीसाठी हे पुण्यात संहिता स्मृति फार्मा वर , आमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे, अधिक माहिती साठी संपर्क- +918149368523
  आपला
  वैद्य पाटणकर हरिश.
  BAMS, MD, PhD (Sch).
  आयुर्वेदार्य , एम डी, नाडी तज्ञ,
  भारत व रशिया तील प्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक.