प्राचीन गुरुकुल
प्राचीन संहिता गुरुकुला

Pune  November 10,2020

   #पारद शिवलिंग# .. हजार शिवलिंगांचे दर्शन घेतल्यानंतर जे फळ मिळते तेच फळ अवघ्या एका पारद शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने मिळते. आम्ही प्राचीन संहिता गुरुकुलातील सर्वजन भाग्यवान ठरलो ज्यांना याचे दर्शन याची देही याची डोळा मिळाले. एवढेच नव्हे तर आम्हालाच काही वनस्पती तेथूनच आणायला सांगून तम्बाखू मळाल्यासारखा पारा त्यांनी आमच्यासमोर दोन मिनिटात मळून दाखवला. पारद बद्ध केला. आजपर्यंत फक्त ग्रंथातच वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्ष पाहायला मिळाला. लोप पावत चाललेल्या कित्त्येक गुप्त विद्यांची माहिती त्यांनी दिली. सगळच काही अद्भुत व अवर्णनीय होत. श्री अरुणकुमार यांनी प्रत्यक्ष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदिजी, आयुष विभागाचे मंत्री श्री श्रीपाद्जी नाईक यांच्यासमोरही याची प्रात्याक्षिके केलेले व पारद शिवलिंग बनवून दिलेले दाखले फोटोसह सप्रमाण मुलांना दिले. गुरुकुलातील सर्वच मुले खरच यावेळी भाग्यवान ठरली. कारण यातील कित्त्येक गोष्टी मीच स्वत: माझ्या आयुष्यात प्रथम पहिल्या होत्या. आमचे स्न्हेही श्री सुर्यकांत घाडगे , साई धाम , बारामती यांनी हा योग जुळवून आणल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्य तो आयुर्वेद आणि धन्य ते नागार्जुन ..!! रसे सिद्धे करिष्यामि !! .... वैद्य पाटणकर हरिश, प्राचीन संहिता गुरुकुल.