Seminar & Programs
World Ayush Expo 2019 Program

Vashi  August 25,2019

  

ठरवलं तर काहीच अशक्य नसतं,
आयुष्य फार सुंदर आहे.
फक्त अर्धा पेला भरलेला की रिकामा हे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
काल वर्ल्ड आयुष एक्स्पो मध्ये, केशायुर्वेद वरती विशेष व्याख्यान होत, पायाला दुखापत झाल्याने ६-७दिवस घरीच बसून होतो, पायाचे प्लास्टर घेऊन जाणे पण शक्य होईल की नाही समजत नव्हते,
पण सर्व शक्य झालं.
सर्वांनी फार उत्तम सहकार्य केले.
इंटरनॅशनल समिट मध्ये विशेष सत्कार ही झाला, चेअर पर्सन म्हणून सायंटिफिक सेशन चे काम ही केले.
बाहेर लावलेल्या दिमाखदार आयुर्वेद आंबेसिडर वॉल वर आपला फोटो बघून आयुर्वेदात छोटी छोटी जमतील तशी कामे करता करता, केसांसारख्या क्षुद्र व दुर्लक्षित मलावर काम करता करता आपण देश विदेशातील अनेक वर्ष्यापासून या क्षेत्रात काम करनाऱ्या या मंडळींसोबत अश्या जागतिक आयुर्वेदाच्या संमेलनात विदेशातील आयुर्वेद आंबेसिडर म्हणून गौरव होईल असे कधी वाटलं ही नव्हतं.
पण तेही शक्य झालं.
केशायुर्वेद चे देशविदेशात 108 सेंटर्स झाले.
अनेक जणांच्या भेटी झाल्या.
घनश्याम मर्दा सर, सुकुमार सरदेशमुख, मनोज चौधरी सर, घुमें सर, विराज सर आणि माझ्या सर्व विद्यार्थी वर्ग व केशायुर्वेद मेंबर चे यासाठी विशेष आभार.
अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
मात्र बऱ्याच जणांना पायाला काय झालं या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं.
7 दिवसांपासून कळवलं ही नव्हतं.
मग अनेक तर्क वितर्क व काळजीचे फोन येऊ लागलेत.
म्हणून खास तुम्हाला म्हणून सांगतोय...
कधी कधी आयुष्याचा पेला भरला आहे असे वाटलं की तो निर्माता बरोबर त्याला थोडा रिता करतो...
पुन्हा नव्याने भरण्यासाठी...
खरंतर त्यालाच आपली काळजी जास्त असते,
जास्त धावपळ झाली, तुम्ही फार आकाशात उडू लागलात की तो बरोबर थोडा वेळ जमिनीवर आणतो..
सक्तीची विश्रांती देतो...
आपले छंद जपायला लावतो आणि आपल्या माणसांसोबत मनसोक्त गप्पा व वेळ घालवायला लावतो...
#God_is_Great.
#When_anything_is_unavoidable_then_enjoy_it
#मी आणि व.पु....
बऱ्याच दिवसांनंतर एकत्र...
सहजच घरी येताना 8 दिवसांपूर्वी क्लिनिक समोर पाय मुरगळला आणि निमित्त झाले...
हेअर लाईन फ्रॅक्चर... प्लास्टर..
सक्तीच्या विश्रांतीचे....
आनंदाचे...
स्वतः ला वेळ देण्याचे...
जमिनीवर येण्याचे...☺️☺️☺️
टीप- अर्धवट समजल्याने बरेच जण उगीच फार काळजी करत आहेत, कृपया फार काळजी करू नका, हा.. निवांत गप्पा मारायच्या असतील तर फोन करून घरी या... मी मोकळाच आहे😂😂