प्राचीन गुरुकुल
प्राचीन संहिता गुरुकुल - पुष्प ९ वे

Pune  February 23,2019

  

आधुनिक काळातील प्राचीन संहिता गुरुकुलाच्या ९व्या पुष्पाच्या ज्ञानयज्ञास सुरू करीत आहोत!!
आयुर्वेद म्हणजे गुरू व निसर्ग यांच्या सान्निध्यात व मार्गदर्शनात शिकायचे शास्त्र. पण खरंच आपण प्राचीन काळातील पद्धतीप्रमाणे आयुर्वेद शिकतोय का?? जगतोय का??
प्राचीन संहिता गुरुकुलात आपण या सर्व गोष्टींचा पुरेपूर आनंद घेतो . मग ते सकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठून निंब काष्ठाने दंतधावन , उटण्याने स्नान असो किंवा वनस्पतींसोबत गप्पा असो!!

मागील ८ पुष्पामध्ये प्राचीन संहिता गुरुकुलात विविध विषयांवर विविधांगी अभ्यास केला जातोय.याही पुष्पामध्ये अश्याच एका विषयावर आपण संहितांसोबत संवाद साधून सुरेख अभ्यास करणार आहोत.

आयुषो वेद: आयुर्वेद म्हणजे आयुष्य जगायला शिकवणारा आपला आयुर्वेद.
या अथांग शास्त्रात निसर्ग,संगीत,वनस्पती इ. सर्व गोष्टींचा समावेश होतो.
प्राचीन संहिता गुरुकुलात आपण आयुर्वेदाचा या सर्वांच्या सान्निध्यात अभ्यास करणार आहोत.

आयुर्वेद कसा शिकायचा हे शिकण्यासाठी या पुष्पांत नक्की सहभागी व्हा