प्राचीन गुरुकुल
सिद्धांत म्हणजे काय ? - वैद्य हरिश पाटणकर

pune  October 31,2018

  

आजपर्यंत तुम्ही सर्वांनीच मी फेसबुकवर टाकलेल्या सर्वच आयुष्य जगण्याच्या साध्या सोप्या सिद्धांन्तांना फार सुंदर प्रतिसाद दिलात ....दुबई पासुन अनेक मित्रांचे , वाचकांचे फोन ,मेसेज यायचे, या सिद्धांतांनी जगणं सोपं केलं म्हणुन. सहज सुचलेले, कधी आदरणीय सरांनी शिकविलेले , कधी नेहमीचेच पण आपल्याला पटलेले तर कधी अनुभवातुन आलेलं हे सिद्धांत आपलं आयुष्य खरंच सुंदर बनवतात. या सिद्धांतांना खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव प्राचीन संहिता गुरुकुलात दृकश्राव्य बद्ध केले आहे. कदाचीत यामुळे मलाही तुमच्याशी थेट संवाद साधल्याचे समाधान मिळेल. तर मग हा संवाद नक्की होवुद्या तुमच्या शंकाही नक्की विचारा.