Achievements 
ट्रायकॉन २०१९

pune  April 19,2019

  

डॉ. पाटणकर यांना ट्रायकॉन मध्ये उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक
पुणे : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ट्रायकॉन २०१९ या केशव्याधींवरील जागतिक परिषदेत पुण्यातील डॉ. स्नेहल पाटणकर यांना उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक मिळाले. आयुर्वेदात पहिल्यांदाच अशा पध्दतीची परिषद भरवण्यात आली होती. देशभरातील डॉक्टर, संशोधक, प्राध्यापक आणि आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्यांना त्यांचा शोधनिबंध सादर करण्याची संधी देण्यात आली होती. या परिषदेत १८४ शोधनिबंध सादर झाले.  केशविकारांचे आधुनिक उपकरणांद्वारे व आयुर्वेदीय पद्धतीने निदान व विश्लेषण या विषयावर डॉ. पाटणकर यांनी शोधनिबंध सादर केला.

आयुष मंत्रालयातील संयुक्त सल्लागार डॉ. डी. सी. कटोच यांच्या हस्ते डॉ. पाटणकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ.बलदेव कुमार, दिनेश कुमार, वैद्य देवेंद्र त्रिगुणा,डॉ. मुकेश अग्रवाल, अनुराधा अग्रवाल आदी उपस्थित होते. जागतिक स्तरावरील परिषदेत केशव्यांधीवर आयुर्वेदाच्या माध्यमातून कसे उपचार करता येतील, यावर माझा शोधनिबंध होता. त्याला उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला असल्याचे डॉ. स्नेहल पाटणकर यांनी सांगितले.

  डॉ. पाटणकर यांना ट्रायकॉन मध्ये उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक